खासदार संदिपान भुमरे, आमदार विलास
भुमरे यांनी घेतले समाधीचे दर्शन
पैठण, (प्रतिनिधी) : दीपावली सणानिमित्त पैठण येथील श्री संत एकनाथ महाराज समाधी मंदिरात भाविकांनी सकाळी चार वाजेपासून दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दीपावलीच्या पावन पर्वावर भावगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यामुळे मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. पैठणसह ग्रामीण भागांतून भाविकांनी श्री संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली. यावेळी खासदार संदिपान भुमरे यांच्यासह आमदार विलास भुमरे यांनी संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. दीपावलीनिमित्त मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.
मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. भाविकांनी श्रद्धा आणि भक्तिभावाने दर्शन
घेत दीपोत्सव साजरा केला. दिपावली निमित्ताने मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.













